पुणे

नारायणगाव उपबजारातून आखाती देशात टोमॅटो निर्यात सुरू : सभापती काळे 

रविंद्र पाटे

नारायणगाव : देशांतर्गत बाजार पेठेत टोमॅटोचे भाव घटल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारातुन आखाती देशात टोमॅटो निर्यात करण्यास सुरवात केली आहे. मागील तीन दिवसांत उपबजारातुन चांगल्या प्रतीची सुमारे साठ टन टोमॅटो निर्यातीसाठी पाठवली आहेत. अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

सभापती काळे म्हणाले मार्च महिन्यातील लॉकडाऊन, तीन जून रोजी झालेले  निसर्ग चक्री वादळ व  त्या नंतर झालेली अतिवृष्टी या मुळे हे वर्ष शेतकऱ्यांना अडचणीचे ठरले आहे.मागील महिनाभरात कोथिंबीर,मेथी,कोबी, फ्लॉवर या प्रमुख पिकांसह भाजीपल्याच्या बाजार भावात मोठी घट झाली आहे. या मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नारायणगाव येथे टोमॅटोचे राज्यातील मोठे मार्केट आहे.जुन्नर, आंबेगाव सह संगमनेर, बीड, बारामती, शिरूर, श्रीगोंदा आदी भागातून येथील उपबजारात टोमॅटो विक्रीसाठी येतात. या वर्षी अतिवृष्टी,चक्री वादळ या मुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांचा टोमॅटोचा हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोरोनाच्या संसर्ग काळात पुरेशी काळजी घेऊन बाजार समितीने टोमॅटो व भाजीपाला उपबजार सुरू ठेवला होता. नुकसानीमूळे टोमॅटोची आवक कमी होत असल्याने मागील पाच महिने देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटोचे भाव टिकून होते.मात्र मागील आठ दिवसांत  इतर भाजीपल्या प्रमाणे टोमॅटोच्या भावात घसरण सुरू झाली.बाजार पेठेचा आढावा घेतला असता आखाती देशात टोमॅटोला मागणी असल्याने बॉम्बे एक्स्पोर्ट कंपनीने कतार, कुवेत सह इतर आखाती देशात टोमॅटोची निर्यात सुरू केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साइराज टोमॅटो कंपनीचे जालिंदर थोरवे व योगेश घोलप हे येथील उपबाजारातुन रोज सुमारे पंधरा टन चांगल्या प्रतीची टोमॅटो निर्यातिसाठी मुंबई येथील बॉम्बे एक्स्पोर्ट कंपनीला पाठवत आहेत.सात किलोग्रॅमचे बॉक्स तयार करून टोमॅटो निर्यात केली जात आहेत.सध्या देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटो क्रेटला(वीस किलोग्रॅम) प्रतवारी नुसार १००  ते ३०० रुपये भाव आहे.निर्यात सुरू केल्यामूळे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला वाढीव भाव मिळत आहेत.

निर्यातिसाठी टणक व गजरा टोमॅटो आवश्यक आहेत.विरांक या जातीची संकरीत टोमॅटो सात ते आठ दिवस टिकतात. या मुळे उपबजारात या टोमॅटोला वाढीव भाव मिळत आहे.-योगेश घोलप (व्यापारी, साइराज टोमॅटो कंपनी)

या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आठ महिन्यात उपबजारात ३१ लाख ५९ हजार १९९  टोमॅटो क्रेटची आवक झाली.खरेदी विक्रीतुन सुमारे १०६ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून क्रेटला सरासरी ३३८ रुपये भाव मिळाला आहे.-संजय काळे (सभापती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती)

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT