Tomato esakal
पुणे

Tomato : नागरिकांना दिलासा; टोमॅटो आवक दुप्पट; भाव निम्म्यावर

मागील तीन महिन्यांपासून दोनशे रुपयांच्या घरात असलेले टोमॅटोचे भाव आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - मागील तीन महिन्यांपासून दोनशे रुपयांच्या घरात असलेले टोमॅटोचे भाव आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू आहे. बाजारात टोमॅटोच्या आवकेत दुपटीने वाढ झाली. त्यामुळे टोमॅटोचे भाव निम्म्याने उतरले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांनी विकला जात आहे, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मार्केट यार्डात रविवारी (ता. १३) नऊ हजार क्रेट टोमॅटोची आवक झाली. मागील आठवड्यात ही आवक पाच ते सहा हजार क्रेट होती. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोसाठी ३० ते ५० रुपये दर आहे. हा दर मागील आठवड्यात ७० ते १०० रुपये किलो होता, अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली. राज्यभरात टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने भाव मोठ्या प्रमाणावर वाढले होते.

गुलटेकडी मार्केट यार्डात जूनच्या पहिल्या आठवड्यात घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोसाठी प्रतवारीनुसार सहा ते १४ रुपये भाव होता, तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये भाव होता. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून भाववाढ झाली. तसेच टप्प्याटप्प्याने टोमॅटोच्या भावात वाढ होऊन ते दोनशे रुपयांच्या पार गेले होते. आता आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावात घट झाली आहे.

सर्वत्र टोमॅटोचे नवीन उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत टोमॅटोची आवक आणखी वाढेल. त्यांनतर भाव आवाक्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT