Farm House Sakal
पुणे

Tourist : मुळशी, वेल्हे, मावळ, हवेली, लोणावळ्यात पर्यटकांची पसंती; फार्महाउस हाउसफुल्ल!

कोरोनानंतर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंब, मित्रपरिवार किंवा जवळचे नातेवाईक यांच्यासह राहण्या-खाण्यासाठी वेळ देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

नीलेश बोरुडे

कोरोनानंतर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंब, मित्रपरिवार किंवा जवळचे नातेवाईक यांच्यासह राहण्या-खाण्यासाठी वेळ देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

सिंहगड - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील निसर्गसौंदर्य, पर्यटन स्थळे, गडकिल्ले आणि शहरी गजबजाटापेक्षा सुखावणारा निवांतपणा अशा कारणांमुळे मागील काही वर्षांपासून हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये जाऊन वेळ घालवण्यापेक्षा पर्यटक फार्महाउसमध्ये जाऊन राहण्याला पसंती देत आहेत. शनिवार-रविवार किंवा इतर सलग सुट्टी आल्यास पश्चिम हवेली, वेल्हे, मुळशी, मावळ, लोणावळा या भागातील फार्महाउस हाउसफुल्ल होत आहेत.

कोरोनानंतर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंब, मित्रपरिवार किंवा जवळचे नातेवाईक यांच्यासह राहण्या-खाण्यासाठी वेळ देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

त्यातही शहरी भागात असलेल्या हॉटेल किंवा रिसॉर्टच्या झगमगाटाऐवजी नागरिक शहरापासून दूर चांगली सोय असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन राहण्याला प्राधान्य देत आहेत. अनेक उद्योजक, व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी, राजकीय नेते यांनी आपले स्वतःचे फार्महाउस बनविलेले आहेत. सुट्टीच्या दिवशी या व्यक्ती आवर्जून फार्महाउसला जाऊन राहतात.

फार्महाउसला पसंती का?

  • निसर्गरम्य वातावरण

  • मिळणारा एकांत

  • राहण्याच्या आवश्यकतेप्रमाणे सोयी

  • स्वीमिंग पूल, इनडोअर गेम्सच्या सुविधा

  • दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधा

  • परवडणारे दर आणि मुबलक पर्याय

आयटी कंपनीत काम करणाऱ्यांची फार्महाउसला विशेष पसंती आहे. वेगवेगळे समूह दर आठवड्याला आवर्जून फार्महाउसला येतात.

- अमित गोळे, फार्महाउस मालक, पिरंगुट

रिसॉर्ट आणि फार्महाउसच्या राहण्या-खाण्याच्या दरांमध्येही खूप तफावत आहे, त्यामुळेही फार्महाउसची मागणी वाढली आहे.

- अमित पासलकर, रिसॉर्ट मालक, पानशेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT