traffic police Action on vehicle with stickers of MLA in Saswad crime pune sakal
पुणे

Pune News : 'याला आमदार झाल्यासारखं वाटलं..' पण पकडलं पोलिसांनी!

आमदारांचे स्टिकर लावलेले वाहन सासवडला पकडून कारवाई

श्रीकृष्ण नेवसे

सासवड, जि. पुणे : महाराष्ट्र विधानसभा सदस्य.. आमदार असे लिहीलेले आणि मध्यभागी अशोकस्तंभ असे हिरव्या रंगाचे अगदी आमदारांच्या वाहानावर जसे स्टिकर असते, असेच स्टिकर लावलेले एक चारचाकी वाहन पोलीसांना काही दिवसांपासून येथे दिसून आले. त्या त्या वेळी पाठलाग करुनही वाहन सापडले नव्हते.

त्यासंदर्भाने आज (ता.15) सासवड शहरात जेजुरी मार्गावरील जेजुरी नाक्यावर नाकाबंदी व तपासणी पोलीसांनी सुरु केली होती. त्यावेळी हे आमदारांचे स्टीकर लावलेले वाहन अखेर पोलीसांना सापडले. 'याला आमदार झाल्यासारखं वाटतंय..' पण अखेर पकडलं पोलिसांनी अशीच ही घटना म्हणावी लागेल !

पोलीसांनी या कारवाईत क्रेटा प्रकारचे वाहन पकडले. त्यामध्ये कोणीही आमदार नव्हते. तसेच वाहन जो चालवित होता, त्या वाहनाच्या मालकाचे नाव ऋतुराज गायकवाड (रा. काळेवाडी - दिवे, ता. पुरंदर) असे आहे. त्याचे नाव वाहन ताब्यात घेऊन छायाचित्र काढले. मग कोणत्याही आममदारांच्या मालकीचे हे वाहन नसल्याने वाहतुक नियमानुसार स्टिकर काढून जप्त केला.

या क्रेटा वाहनाला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही. त्यामुळे मोटार वाहन कायद्याप्रमाणे 6 हजार 500 रुपये दंड करण्यात आला आहे., अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. अशा पद्धतीने कोणीही स्टिकर लावून दुरुपयोग करीत असतील, फॅन्सी नंबर प्लेट असतील, वाहन कायद्यातील कलमांचे उल्लंघन केले तर याहून कडक कारवाई होईल., असा इशारा पोलीसांनी यानिमित्त दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT