bribe crime sakal media
पुणे

खासगी बसवर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा वाहतुक पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यात

खासगी वाहतुक करणाऱ्या बसवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 5 हजार रूपयांची मागणी करुन 5 हजाराची लाच घेणारा शहर वाहतुक पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी वाहतुक करणाऱ्या बसवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 5 हजार रूपयांची मागणी करुन 5 हजाराची लाच घेणारा शहर वाहतुक पोलिस दलातील पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलिसाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुहास भास्कर हजारे (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय व्यक्तिने तक्रार दाखल केली होती.

'एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका खासगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तर सुहास हजारे हे लोणी काळभोर वाहतुक पोलिस शाखेत पोलिस शिपाई म्हणुन कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या बस स्वारगेट ते सोलापुर दरम्यान, प्रवासी वाहतुक करतात. या बसवर कारवाई न करण्यासाठी हजारे याने त्यांच्याकडे दरमहा 6 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती दरमहा 5 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी "एसीबी"कडे तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. शनिवारी लोणी काळभोर येथील टोल नाक्याजवळ 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना हजारे यांना पकडण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT