समरजितसिंह घाटगे  sakal
पुणे

'सारथी' मार्फत तरुणांना स्थानिक उद्योगांचे प्रशिक्षण द्या

समरजितसिंह घाटगे यांचा सारथीला प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे: ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा (maratha) समाजातील तरुणांना त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक गुणवैशिष्ट्यानुसार कौशल्य विकासासाठी तांत्रिक प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून तरुण व्यावसायिकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवता येईल, असा प्रस्ताव म्हाडाचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeet singh Ghatge) यांनी ‘सारथी’ संस्थेला दिला. या वेळी ‘सारथी’च्या सदस्यांनी या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवली.

‘सारथी’ संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी ही बैठक पार पडली. ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीता नागर, रोजगार व कौशल्य विकासच्या सहायक संचालक अनुपमा पवार, प्रकल्प संचालिका ज्योत्स्ना शिंदे, डॉ. श्रीकांत देशमुख आदी बैठकीस उपस्थित होते.

घाटगे म्हणाले, ‘सध्या व्यवसायासाठी तरुण पुढे येत आहेत. परंतु त्यांना अचूक तांत्रिक प्रशिक्षण नाही. या विषयाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २२ सहकारी बँकांना एकत्र करून समन्वय कक्ष स्थापन केला आहे. त्यातून स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्यांना कर्जपुरवठा करून प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु अनेक तरुणांना स्थानिक गुणवैशिष्ट्यांच्या उद्योगांचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे त्यांना अडचणीचे होत आहे. अशा प्रशिक्षणानंतर बँकांचे क्लस्टर, ‘सारथी’ आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायासाठी प्रयत्न करता येतील. त्या माध्यमातून मराठा समाजाला उद्योगासाठी प्रोत्साहन देऊन त्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न साकारता येईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT