pune sakal
पुणे

लोहगाव विमानतळावर आदिवासी कला संग्रहालय

केंद्र सरकारच्या विशेष योजनेतून ही गॅलरी उभारण्यात आल्याची माहिती आदिवासी संशोधन व विकास संस्थेच्या सहसंचालिका जागृती कुमरे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव पार्क : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘ट्रायबल आर्ट गॅलरी’चे उद्‌घाटन करण्यात आले. आदिवासी कलाकारांना कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष योजनेतून ही गॅलरी उभारण्यात आल्याची माहिती आदिवासी संशोधन व विकास संस्थेच्या सहसंचालिका जागृती कुमरे यांनी दिली. या वेळी पुणे विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख संतोष डाके, आदिवासी विकास संशोधन संस्थेचे अधिव्याख्याता श्‍याम दौंडकर, जयेश कुमार, रमेश रगतवान, सरोजिनी शिरसागर उपस्थित होते.

कुमरे म्हणाल्या, ‘‘आदिवासींच्या संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार होणे काळाची गरज आहे. हे ओळखून केंद्र सरकारने आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध केला होता. हस्तकलेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासाठी संस्थेने रोड मॅप तयार केलेला आहे. जेणेकरून आदिवासी कला आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्य जनतेस सहजरीत्या पाहावयास मिळेल. आदिवासी कलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल हा प्रकल्प तयार करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणामार्फत सहा महिन्यांसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. इतर खर्च केंद्र सरकारच्या निधीतून संस्थेने केलेला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT