पुणे

कोल्हापूरः हळद पिक परिसंवाद

CD

हळद पीक तंत्रज्ञानाबाबत परिसंवाद

ॲग्रोवन वृत्तसेवा
दानोळी, जि. कोल्हापूर ः जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकारअंतर्गत मसाले बोर्ड, मुंबई व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय यांच्यातर्फे शेतकऱ्यांसाठी हळद पीक तंत्रज्ञान परिसंवाद झाला. याचे उद्‍घाटन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे व संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.
डॉ. शिंदे यांनी शेती तंत्रज्ञान व दुष्काळ परिस्थितीत शेतीची घ्यावयाची काळजी आणि शेती उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या एक्सपोर्ट बाजारपेठ याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शक डॉ. मनोज माळी यांनी शेतकऱ्यांना हळद लागवड करण्यापासून हळद उत्पादन घेत असताना हळदीमध्ये आंतरपिके कोणती घ्यावीत. खत मात्रा, त्याचे प्रमाण व पद्धती याची माहिती दिली. पाण्याचे नियोजन कसे असावे, रोगापासून पिकांची मुक्तता, हळद उद्योग, बाजारपेठेतील हळदीचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
डॉ. ममता धनकुटे यांनी हळदीचे व इतर मसाला यांची गुणवत्ता वाढवणे त्याचबरोबर हळद आणि मसाला यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टमधील नफा आणि त्या संदर्भातील कंपन्या या बाबत मार्गदर्शन केले. शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले यांनी केले. डॉ. श्रीनिवास बन्ने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi custody : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपर्यंत मुंबई पोलीस का पोहोचू शकत नाहीत?; 'साबरमती'तून ताब्यात घेण्यास बंदी का?

Mumbai Local: मुंबईकरांनो लोकलचा लेटमार्क विसरा, आता ताशी १०० किमी वेगाने गाड्या धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: पुणे शिक्षक मतदारसंघात पदवीधरांपेक्षा अधिक मतदान; दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर

karnataka Politics : ''मेटा स्मार्ट ग्लास घालून माझं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न'', मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi Protests: सरकारला 'सीजेपी'चा धसका! आंदोलन पुन्हा पेटणार? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT