पुणे

टीव्हीएस मोटरमध्ये शण्मुगम यांची स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती

CD

‘टीव्हीएस’मध्ये शण्मुगम
स्वतंत्र संचालकपदी नियुक्त

बंगळूर, ता. १५ः टीव्हीएस मोटर कंपनीने रवींद्रन शण्मुगम यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती केली आहे. पाच वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले रवींद्रन शण्मुगम हे अनुभवी तंत्रज्ञान उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. ग्राहककेंद्रित व्यवसायांचा विस्तार, डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा त्यांना जागतिक स्तरावरील मोठा अनुभव आहे. सध्या ते ‘मॅब्ले’ या सिंगापूरस्थित एआय-आधारित इंटेरिअर डिझाइन व रिनोव्हेशन प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी ‘मॅकिन्झी अँड कंपनी’मध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले असून, विविध कंपन्यांना वाढ आणि व्यावसायिक धोरणांबाबत मार्गदर्शन केले आहे.
‘टीव्हीएस मोटर कंपनी’चे अध्यक्ष सुदर्शन वेणू म्हणाले, ‘‘रवींद्रन शण्मुगम यांचा अनुभव मोठा आहे. भविष्यातील वाढीच्या आमच्या उद्दिष्टांना अधिक बळ देताना त्यांचे विचार आणि अनुभव टीव्हीएस मोटरच्या संचालक मंडळासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT