पुणे

"जम्बो'तील अडीचशे डॉक्‍टर व चारशे परिचारिकांना मिळेना पगार 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनापासून स्वतःसह घरातल्यांना धोका होईल, ही भीती असूनही रुग्णांवर उपचार करत आहे. आठवडा-आठवडा घरी जात नाही. मात्र, असे असूनही पगार केला जात नाही. तो मागितल्यावर पदरी केवळ आश्‍वासनच मिळतंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही वेळ आली आहे पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील डॉक्‍टरांवर. ती एक-दोघांवर नाही तर अडीचशे डॉक्‍टर, सव्वाचारशे परिचारिका आणि तितक्‍याच कर्मचाऱ्यांवर. जम्बोची उभारणी केलेल्या "पीएमआरडीए', महापालिका आणि नव्या-जुन्या एजन्सीच्या वादात डॉक्‍टरांचे हाल सुरू आहेत. रोज दहा-बारा तास काम करूनही पगार वेळेत मिळत नसल्याने डॉक्‍टर अस्वस्थ झाले आहेत. या साऱ्या प्रकाराला कंटाळून डॉक्‍टर आणि परिचारिका नोकरी सोडून जाण्याच्या मन:स्थितीत असल्याचेही त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"लाइफलाइन'चे कंत्राट रद्द केल्यानंतर पुणे आणि पिंपरीतील "जम्बो'त "मेड-ब्रो' या एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीला नऊ सप्टेंबरपासून काम करण्याचा (वर्क ऑर्डर) आदेश दिला. त्यानंतर या दोन्ही "जम्बो'तील बेडच्या क्षमतेनुसार डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. रुग्णांवरील उपचार खर्चाची बिले तपासून, पैसे देण्याची जबाबदारी "स्टिअरिंग कमिटी' आहे. त्यानुसार ही बिले महापालिकेच्या माध्यमातून "पीएमआरडीए'कडे पाठविली जातात. त्यानुसार "मेड-ब्रो'कडून आलेली सुमारे 6 कोटी रुपयांची चार बिले महापालिकेने "पीएमआरडीए'कडे पाठविली. परंतु, त्यातील दोन कोटी रुपये एजन्सीला मिळाले. त्यातून डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांचा पगार करणे शक्‍य नसल्याचे एजन्सीचे अधिकारी सांगत आहेत. या प्रक्रियेत डॉक्‍टर, परिचारिकांना पगाराकडे डोळे लावून बसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे जम्बो 
डॉक्‍टर परिचारिका अन्य कर्मचारी 
119 200 127 
प्रत्यक्ष बेड ऑक्‍सिजन आयसीयू 
800 600 200 

पिंपरी जम्बो 
डॉक्‍टर परिचारिका अन्य कर्मचारी 
129 222 300 
बेड ऑक्‍सिजन आयसीयू 
800 600 200 

खर्च 
पुणे आणि पिंपरी जम्बो देखभाल-पगार 
6.5 कोटी (महिन्याकाठी) 
नव्या एजन्सीला प्रत्यक्षात मिळाले रक्कम 
2 कोटी 

जम्बोच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या एजन्सीकडून आलेली बिले तपासून, ती मंजुरीसाठी "पीएमआरडीए'कडे पाठविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ती आल्यानंतर बिले देण्यात येत आहेत. बिले रोखली जात नाहीत. 
-सुहास दिवसे, आयुक्त पीएमआरडीए 
 

एजन्सीची बिले तपासून, ती "पीएमआरडीए'कडे पाठविली आहेत. मात्र, काही बिलांत त्रुटी असल्याने ती दुरुस्त करून पाठविण्यात येतील. 
-राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो व्यवस्थापन समिती, पुणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT