UGC NET exam File Photo
पुणे

कोरोनाचा कहर : नेट परीक्षाही ढकलली पुढे; एनटीएची घोषणा

नेट परीक्षेच्या नव्या तारखा पंधरादिवस आधी होतील जाहीर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात 'नेट' परीक्षेला देखील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थगिती देण्यात आली आहे. ही परीक्षा २ मे ते १७ मे दरम्यान देशभर होणार होती. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याबाबत एनटीएला परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली होती.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरात नेट परीक्षा घेतली जाते. प्राध्यापक होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असल्याने देशभरातील लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित ऑनलाइन पद्धतीने होत असून, त्याचा तारखा 'एनटीए'ने जाहीर केल्या आहेत. ८० विषयांसाठी नेट परीक्षा २ ते १७ मे या कालावधीत होणार होती. या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, त्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे 'एनटीए'कडून आता परीक्षेची तयारी सुरू आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यानी कठोर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र सरकारने एमपीएससी, वैद्यकीय परीक्षा आणि दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्र सरकारने सीबीएसई, आयसीएसई, पदव्युत्तरच्या वैद्यकीय परीक्षा, जेईई मेन्स परीक्षा लांबणीवर टाकली आहे. मात्र नेट बद्दल निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

देशभरात स्थिती गंभीर झाल्याने नेट परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी एटीएला तशी विनंतीही केली होती. त्यानुसार एनटीएकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजिन तारीख १५ दिवस आधी कळवली जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT