pune sakal
पुणे

खराडी येथे अनधिकृत बांधकामांवर हातोडा

महापालिकेच्या हद्दीत खराडी गाव येऊन अनेक वर्षे झाली तरी अनेक नागरिकांकडून महापालिकेच्या नियम व अटी कडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : खराडी ( kharadi) मधील चौधरी वस्ती येथे अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) बांधकाम विभागा कडून कारवाई करण्यात आली. यामध्ये 10,800 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या हद्दीत खराडी गाव येऊन अनेक वर्षे झाली तरी अनेक नागरिकांकडून महापालिकेच्या नियम व अटी कडे दुर्लक्ष करून टोलेजंग इमारती उभारल्या जात आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर सध्या पुणे महानगरपालिके कडून कारवाई केली जात आहे.

चौधरी वस्ती सर्व्ह नंबर 41/2 येथे अनधिकृत बिल्डिंगचे बांधकाम करण्यात आले होते. पालिकेच्या बांधकाम विभागा कडून नोटीस ही देण्यात आली होती . आज दुपारी जॉब कटरच्या सहाय्याने अनधिकृत बिल्डिंगचे बांधकाम तोडण्यात आले.

सदर कारवाई बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता किरण कलशेट्टी , निखिल गुलेच्छा ,दत्तात्रय चव्हाण, प्रतिक पाथरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT