Pune Porsche Accident esakal
पुणे

Pune Porsche Accident: पुणे अपघातातील आरोपींच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर...

pune porsche accident: २००७-०८ मधील हे प्रकरण आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामधील एका प्रकरणात सुरेंद्र अग्रवालचे देखील नाव होते.

Sandip Kapde

Pune Porsche Accident

पुण्यात गेल्या शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पोर्शे या आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एक अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवत होता. आता याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला अटक केली आहे.

आरोपीच्या वडिलांना महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल अग्रवाल याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे.

विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी सबंध असल्याचे माहिती मिळाली आहे. यापूर्वी देखील खुनाच्या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणल्याचे समोर आले आहे.

याच प्रकरणात कोझी आणि ब्लॅक बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली. पुण्यातील हा अपघात पुण्यात नाही तर देशात चर्चेत आला आहे. विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

संपत्तीच्या वादात अपघातातील आजोबा यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात आल्याची देखील चर्चा आहे.

या प्रकरणात आरोप पत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवालच्या वडिलांना अटक झाली नव्हती. मोक्का लावणं अपेक्षित असताना देखील आयपीसी सलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.

२००७-०८ मधील हे प्रकरण आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामधील एका प्रकरणात सुरेंद्र अग्रवालचे देखील नाव होते.

आरोपीच्या वडिलांवर काय आरोप?

अपघाताच्या वेळी पोर्श कार ताशी 200 किलोमीटर वेगाने जात होती. आरोपी अल्पवयीन चालकाचे वडील विशाल ब्रह्मा रियल्टी नावाची कंपनी चालवतात. आरोपी अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो पार्टी करून परतत होता. या अपघातानंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणही केली. (pune accident news)

आरोपी वडिलांवर आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्श चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या मुलांना ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवायला दिली हा निष्काळजीपणा आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली जात होती त्या पबवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि पबवरही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT