बारामती, ता. १९ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे आणि बॅनरबाजीला फाटा देत निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम बारामतीत राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी बारामती वनविभागातील विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
बारामती नगर परिषदेचे नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षसंवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि पशुपक्षी व वन्यजीवांप्रती संवेदनशीलता जोपासणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी माळेगावचे नगरसेवक पप्पू खरात, वैभव खंडाळे, संतोष आटोळे, प्रमोद डिंबळे, नीलेश झगडे, शैलेश झाडबुके, नीलेश झाडबुके, उत्तम धोत्रे, श्रीपाद राऊत, डॉ. पंजाबराव पाटील, अमोल कुलट, सचिन डफळे आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावून त्याचे योग्य संगोपन करावे. तसेच पशुपक्षी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे.
- बिरजू मांढरे, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.