पुणे

दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना परत मिळणार परीक्षा शुल्क

CD

विद्यापीठ लोगो
----------
दिवाळीपूर्वी विद्यापीठ परत देणार परीक्षा शुल्क
संलग्नित महाविद्यालयांकडून मागविली दुष्काळग्रस्तांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी परीक्षा शुल्क परत दिले जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांना त्यांच्याकडील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती वेळेत द्यावी लागणार आहे. बुधवारी विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. साधारणत: जिल्ह्यातील ४५ ते ५० हजार विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या निर्णयामुळे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय झाला. आता आपल्याकडे प्रवेश घेतलेला कोणता विद्यार्थी दुष्काळग्रस्त आहे, याची माहिती महाविद्यालयांकडून विद्यापीठाला जाईल. त्यानंतर विद्यापीठ त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करेल. विद्यापीठाशी संलग्नित ११५ महाविद्यालये असून नोव्हेंबरअखेर होणाऱ्या परीक्षेसाठी सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता महाविद्यालयांकडून किती लवकर माहिती विद्यापीठाला पाठवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
कोट
PNE26W58539
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकडून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून अर्ज केले आहेत, त्यांना महाविद्यालयांकडून माहिती आल्यावर शुल्क परत केले जाणार आहे. सध्या विलंब शुल्क भरून जे विद्यार्थी अर्ज करीत आहेत, त्यांना शुल्क न भरता अर्ज करता येईल.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू
---
चौकट
परीक्षा शुल्क न देता भरा
दहावी-बारावीचे परीक्षा फॉर्म
राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा तथा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणे सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्क असणार आहे. पुणे विभागातील अवघ्या २१८ विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत शुल्क भरले असून, त्यांना शुल्क परत देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क न भरता अर्ज करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT