पुणे

नगर मधील नवदुर्गा

CD

PNE26W58720
(न्यायमूर्ती उर्मिला फलके-जोशी)
-----
नवदुर्गा


शेवगाव तालुक्यातील तळणी देवीच्या भूमीत जन्मलेली आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान ठरलेली एक कन्या आज मुंबई उच्च न्यायालयात उर्मिला जोशी-फलके जिल्ह्यातील पहिली महिला न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

-गोरक्षनाथ बांदल
----------

हे केवळ एका पदावर पोहोचणं नाही, तर डोळ्यांवरची पारंपरिक काळी पट्टी बाजूला सारून, अन्यायाविरुद्ध डोळे वटारून ‘डोळस’ न्याय देणाऱ्या एका खऱ्या न्यायदेवतेचा हा हुंकार आहे! माजी आमदार फालके गुरुजींची नात आणि आदर्श भाषा शिक्षक शरदचंद्र फालके यांची ही कन्या. रक्तातच शिक्षकी पेशाचा प्रामाणिकपणा आणि संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांनी प्रवास सुरू केला. अहिल्यानगर येथे सरकारी वकील म्हणून कायद्याचे दांडगे ज्ञान सिद्ध केल्यानंतर, अंबाजोगाईच्या योगेश्‍वरी देवीच्या परिसरात जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी आपली जरब निर्माण केली आणि आज त्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायाचा नवा इतिहास लिहीत आहेत.

अन्यायाविरुद्ध आक्रमक
त्या केवळ कायद्याची कोरडी पुस्तकं वाचून निर्णय देत नाहीत, तर समाजाच्या जळत्या वास्तवावर फुंकर घालतात. तणावग्रस्त माता-पित्यांच्या बालकांचा टाहो : जेव्हा आई-वडिलांच्या भांडणात मूल भरडले जाते, तेव्हा एका मातेच्या संवेदनशीलतेने बालकांच्या भविष्याला आधार देण्याचे काम त्यांनी केले. नोकरदार महिलांची ओढाताण : घर आणि नोकरी सांभाळताना महिलांची होणारी घुसमट ओळखत, ‘संसार म्हणजे थट्टा नाही’ हे त्यांनी पुरुषप्रधान मानसिकतेला आणि समाजाला कठोर शब्दांत सुनावले.
पक्षकार आणि वकिलांचा न्याय : पक्षकारांच्या चुकांसाठी वकिलांना बळीचा बकरा बनवू नका, हे सांगतानाच जर एखादा वकील चुकत असेल, तर त्याला जागेवर दंड ठोकण्याचं धाडस फक्त याच न्यायदेवतेत आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर खंडपीठासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या डीजेच्या प्रचंड गोंगाटाचा आणि त्रासाचा विषय आला. तेव्हा कोणत्याही दबावाला बळी न पडता, न्यायमूर्ती उर्मिला फालके यांनी वज्रप्रहार केला. त्या अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत म्हणाल्या ‘‘तुमचा आनंद साजरा करण्याचा अधिकार इतरांच्या शांततेने जीवन जगण्याच्या हक्कामध्ये बाधा आणणारा असता कामा नये,’’ हा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्थेची खरी व्याख्या समाजाला दाखवून दिली.

ज्ञान अन् न्यायाचा संगम
आजोबा आणि वडिलांचा शिक्षकी वारसा त्यांनी केवळ जपला नाही तर वाढवला. आज नागपूर येथील नामांकित ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ (एनएलयू) च्या अकॅडमिक कौन्सिलचे चेअरमनपद त्या भूषवत आहेत. म्हणजेच, देशाचे भविष्य घडवणाऱ्या आगामी वकिलांना आणि न्यायाधीशांना दिशा देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे.

साष्टांग दंडवत !
आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक अन्यायाच्या चिंधड्या उडवणारी, कायद्याचे कवच बनून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही नगरची रणरागिणी आहे. तळणी गावातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT