Vaccination esakal
पुणे

पुण्यात कामाच्या ठिकाणी ३० हजार जणांचे लसीकरण

महापालिकेचा पुढाकार; सामाजिक संस्था, वृद्धाश्रम, विशेष नागरिकांना सुविधा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात शाळा, रुग्णालयांमध्ये महापालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले असले तरी काही जणांना केंद्रांवर येता येत नाही. तर ज्या ठिकाणी १०० पेक्षा जास्त जणांचे लसीकरण होऊ शकते, अशा कामाच्या ठिकाणी जाऊन मोफत लसीकरण करण्याचा प्रयत्न महापालिका करते. त्याच माध्यमातून शहरात आतापर्यंत १५९ ठिकाणी ३० हजार ३७७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे नागरिक मोफत लसीकरणाला प्रतिसाद देत आहेतच, पण मोफत मिळाली नाही तर खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लसीकरण करून घेत आहेत. मुख्य महापालिका भवनात घनकचरा विभागात मंगळवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून शहरात १५९ ठिकाणी महापालिकेचे पथक जाऊन तेथे ३० हजार ३७७ जणांना लस दिली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृद्धाश्रम आणि विशेष दिव्यांगांसाठी ५५ ठिकाणी पाच हजार २०२ जणांचे लसीकरण केले तर विविध संस्था आणि शासकीय संघटनांच्या माध्यमातून १०४ ठिकाणी लसीकरण केले. तेथे २५ हजार १७५ जणांनी लाभ घेतला.

''पुण्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सामाजिक संस्था, वृद्धाश्रम, विशेष नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्था व शासकीय संस्थांच्या माध्यमातून १५९ ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना त्यांच्या निवास व कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात आले आहे.''
- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT