लसीकरण 
पुणे

पुण्यात आज होणार ७२ केंद्रांवर लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या (सोमवारी) ७२ केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. त्यापैकी ५६ केंद्रावर कोविशील्ड लस दिली जाईल. उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी राखीव असणार आहे.

४५ वर्षे वयापुढील नागरिकांनी १५ मार्च पूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना सोमवारी लस मिळणार आहे. ६० टक्के लस ही ४५ वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल. उर्वरित लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंट लाईन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल. याशिवाय ज्या नागरिकांनी नोंदणी केली नाही, परंतु ते केंद्रांवर आले असतील आणि लस शिल्लक असल्यास त्यांना ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून ती देण्यात येईल.

कोव्हॅक्सिनचे लसीकरण १६ केंद्रांवर सुरू राहणार आहे. उपलब्ध साठ्यापैकी १० मे पूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. अशा साठ टक्के नागरीकांना दुसरा डोस देण्यात येईल. उर्वरित ४० टक्के लस ही ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी करून दिली जाणार आहे.

घोरपडी पेठेत लसीकरण केंद्र

पुणे महापालिकेच्या वतीने घोरपडी पेठेतील उर्दू शाळा क्रमांक १३ मध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. भागामध्ये लसीकरण केंद्र जवळ नसल्याने नागरिकांना गाडीखाना, भवानी पेठ, गुरुवार पेठ या केंद्रांवर जावे लागत होते. तेथेही प्रचंड गर्दी होत असल्याने लोकांना लस घेण्यासाठी पहाटे जाऊन नंबर लावावा लागत होता. नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक अजित दरेकर यांच्या हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रांचे उद्‌घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT