पुणे

वंदे मातरम् राष्ट्रीय गीताला ''जन गण मन'' च्या बरोबरीचा दर्जा दिला जावा, याचिकेवर 27 तारखेला सुनावणी

CD

‘वंदे मातरम्’ला हवा
‘जन गण मन’चा दर्जा

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला ‘जन गण मन’च्या बरोबरीचा दर्जा दिला जावा, अशी विनंती ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टात वर्ग केली जावी, असे उपाध्याय यांनी म्हटले असून, त्यांच्या याचिकेवर २७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात वंदे मातरम् राष्ट्रीय गीताने ऐतिहासिक भूमिका बजावली होती. त्यामुळे या गीताला ‘जन गन मन’च्या बरोबरीचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. घटनासभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’च्या अनुषंगाने १९५०मध्ये केलेल्या वक्तव्याचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. ‘जन गण मन’मध्ये देशाच्या राज्यव्यवस्थेशी संबंधित भाव व्यक्त होतात. तर ‘वंदे मातरम्’ देशाचे चरित्र आणि ओळख दर्शवते. त्यामुळे ‘वंदे मातरम्’लाही समान दर्जा मिळाला पाहिजे, असे उपाध्याय यांनी याचिकेद्वारे सांगितले आहे. देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्येक कार्यदिवशी ‘वंदे मातरम्’ गाण्याचे निर्देश दिले जावेत, दोन्ही गीतांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय धोरण निश्चित करावी, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT