Vasantdada Sugar Institute Governing Council sakal
पुणे

Pune News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे गुजरातमध्ये उपकेंद्र करणार - महासंचालक संभाजी कडू-पाटील

गुजरातमध्ये उपकेंद्र सुरु करण्याचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या उपकेंद्रासाठी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमध्ये जागेचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गुजरातमध्ये उपकेंद्र सुरु करण्याचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या उपकेंद्रासाठी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमध्ये जागेचा शोध घेण्यात येत आहे. महाराष्ट्राच्‍या सीमेला लागून गुजरात राज्यात जागा मिळाल्यास, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राज्याबरोबरच बाहेरसुद्धा विस्तार होईल, असे या संस्थेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी शुक्रवारी (ता.१५) सांगितले.

संस्थेच्या नागपूर येथील प्रस्तावित उपकेंद्रासाठी येथील बुटीबोरी परिसरात आतापर्यंत ११५ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात आणि विदर्भातील नागपूर येथे उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता.

नागपूर येथील उपकेंद्रासाठी नितीन गडकरी सातत्याने पाठपुरावा करत होते. या उपकेंद्रामुळे विदर्भातील साखर कारखानदारीला बळ मिळू शकणार आहे. या उपकेंद्रासाठी बुटीबोरी परिसरातील म्हासाळा आणि गोपाळपूर गावाच्या परिसरात ही ११५ एकर जमिनी खरेदी करण्यात आली आहे.

नागपूर येथील उपकेंद्रात नव्या वाणांच्या उसाच्या बेण्यासाठी लागवड, शेतकरी प्रशिक्षण, साखर कामगारांना प्रशिक्षण आणि संस्थेच्या वतीने संशोधित औषधे, खते आणि अन्य उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने मराठवाडा, विदर्भानंतर खानदेशातही उपकेंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT