Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : येरवडा, लोहगाव परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना शनिवारी (ता. १७) घडल्या. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात रिक्षासह इतर वाहनांचे नुकसान केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना शनिवारी (ता. १७) घडल्या. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात रिक्षासह इतर वाहनांचे नुकसान केले. येरवड्यात झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. त्यानंतर या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले.

लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकरणी करण विजय दोरकर (वय १९, रा. लोहगाव), शाबाद आयुब औटी (वय १८, रा. लोहगाव), तसेच दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अमोल अनंत कानू (वय ३९, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोरकर, औटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी ‘झुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली.’ आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT