Vehicles vandalized Saturday midnight Wanavadi Gavthan pune crime police sakal
पुणे

Crime News : वानवडीत पोलीस उपआयुक्तालयापासून १०० मीटर अंतरावर अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

वानवडी गावठाण परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : वानवडी गावठाण परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड केली आहे. वानवडी गावात परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय कार्यालय असून त्यांच्या शंभर मीटर ही घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तीन महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वानवडी गावठाणातील खालची आळी, वरची आळी परिसर तसेच शिवरकर दवाखाना परिसरात रात्री अज्ञात व्यक्तीने दुचाकी, तीनचाकी, चारचारकी अशा जवळपास ३० ते ४० वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच घरांवर देखील दगड मारले आहेत. वाहनांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलिसांनी पहाणी केली आहे, त्या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात सर्व घटना कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे ४ ते ५ व्यक्तींचा हात असू शकतो. यामधील संशयित व्यक्तीची ओळख पटली असून पियुष मुरुटे (वय २२) असे त्याचे नाव आहे. या गुन्हेगारांचा शोध घेत असल्याची माहिती वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली.

गावात दिवसेंदिवस अवैध धंद्याचे व रस्त्यांवर मद्यपींचे प्रमाण वाढले आहे. याचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी तोडफोड झाल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय गावालगत आहे. तरीही अवैध धंदे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक शिल्लक राहिला नसल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT