Pune University Sakal
पुणे

पुणे : रिक्त पदांबद्दल कुलगुरूंनी व्यक्त केली खंत

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या रिक्त पदांबद्दल खंत व्यक्त केली

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची ५५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहे. त्यामुळे विद्यापीठाचे रोजच्या व्यवस्थापनात अनेक अडचणी निर्माण होत असून, त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामगिरीवरही होत आहे. गुरुवारी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या रिक्त पदांबद्दल खंत व्यक्त केली.

देशातच नव्हे तर जगभरात नावाजलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सध्या अपुरी प्राध्यापक आणि कर्मचारी संख्येच्या समस्येला तोंड देत आहे. विद्यापीठातील तब्बल २१० प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. अगदी विद्यापीठातील एक नावाजलेला विभाग बंद करण्याची नामुष्कीही ओढवली आहे. व्यवस्थापन परिषदेने ठराव पास करून राज्यशासनाला रिक्त पदांची जाणीव करून दिली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू म्हणाले,"विद्यापीठातील अनेक चांगले शिक्षक निवृत्त होत आहे. प्रशासनातील अनेक कुशल कर्मचाऱ्यांची सेवा संपत आहे.

पण त्या प्रमाणात पदे भरली जात नाही. या रिक्त असलेल्या खुर्च्या मला खुणावत आहे." वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी आणि प्राध्यापक रिक्त पदांची खंत बोलून दाखवली आहे.विद्यापीठातील विविध विभागांसाठी मंजूर असलेल्या 386 पैकी केवळ 176 पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे देशात आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाला गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीला बंदी असल्याने विद्यापीठाच्या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात बंदी असूनही लेझर लाईटचा धुमाकूळ

Nainital Adventure Sports: नैनीझीलच्या लाटांवर रंगणार जलक्रीडेचा थरार; स्विमिंग-कयाकिंगसोबत विंड सर्फिंग अन् डायव्हिंग

Pica Disorder Case: पोटात ६ सुया, हेअर पिन अन् काचेचे तुकडे; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचला! काय आहे पायका डिसऑर्डर?

Nagpur illegal steroid sale: नागपुरात परवाना नसताना टेस्टोस्टेरॉन औषधांची विक्री; १६.६५ लाखांचा साठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

Pune Airport : विमानतळावर ‘ई-बोर्डिंग’ सुविधा; इमिग्रेशनसाठी शिक्का मारण्याची पद्धत आता बंद

SCROLL FOR NEXT