पुणे

तंटामुक्त अध्यक्षपदावरूनच गावागावांत तंटे

CD

आळेफाटा, ता. २७ : ग्रामीण भागात शांतता व सलोखा राखण्यासाठी स्थापन झालेल्या तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरूनच आता गावागावांत तंटे होऊ लागले आहेत. राजकीय वर्चस्व आणि प्रतिष्ठेच्या लढाईमुळे या समित्यांना उतरती कळा लागली आहे.
अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या समर्थकांमध्ये मतभेद निर्माण होत असून, काही ठिकाणी ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे तंटे मिटविण्यासाठी असलेल्या समित्यांच्या निवडीचाच मुद्दा गावातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तंटामुक्त समित्या या ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून या समित्यांचे अस्तित्व शिल्लक राहिले तरच गावात सामाजिक सलोखा राहणार आहे, त्यामुळे तंटामुक्त समित्यांना पुनर्जीवित करण्याची गरज आहे. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची निवड ही ग्रामसभेतून केली जाते. मात्र त्यामध्येही लॉबिंग होत असल्याने तंटामुक्त अध्यक्षांच्या निवडीवरूनच तंटे होऊ लागले आहेत.
या समितीत गुंड प्रवृत्तीच्या, अवैध धंदे असणाऱ्यांचा तसेच असामाजिक तत्त्वांचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही स्थान दिले जात नाही. समितीचे सदस्य उत्तम चारित्र्याचे असावेत हा शासनाने घालून दिलेला दंडक पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला आहे, तरीही अध्यक्ष निवडीवरून भांडणे होतात. बऱ्याच दिवसांपासून पोलिस प्रशासनाला अनेक गावांत वाद-विवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. तंटामुक्त समित्यांनी प्रामाणिकपणे ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊन गावांचे संघटन होऊ शकते, याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असून अध्यक्षपदाची निवड ही प्रतिष्ठेचा किंवा राजकीय वर्चस्वाचा विषय न बनवता गावाच्या हिताचा विचार करून करण्यात यावी. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वाद कमी व्हावेत, सामाजिक एकोपा वाढावा व सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री शहरातील मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि मनोरंजनासाठीची मैदाने आमदारांना आणि बिल्डर मित्रांच्या हवाली करत आहेत - आदित्य ठाकरे

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

SCROLL FOR NEXT