गुरोळी (ता. पुरंदर) ः येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली भेटकार्ड, शुभेच्छा पत्रे सीमेवरील सैनिकांसाठी स्नेहांकुर संस्थेच्या पदाधिकाऱयांकडे स्वाधिन केली, त्याचे दृश्य.  sakal
पुणे

सासवड : विद्यार्थ्यांची भेटकार्डे, शुभेच्छा पत्रे सैनिकांसाठी रवाना

भेटीत स्नेहांकुर संस्थेच्या पाहुण्यांना दिला शेतातील `वाणवळा`ही., सुंदर हस्ताक्षराचे झाले कौतुक

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व निर्बंंध कमी झाल्याचे अौचित्य साधून गुरोळी (ता. पुरंदर) येथे जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेला पुण्यातील स्नेहांकुर द रे ऑफ होप या संस्थेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट दिली. ही संस्था गेली तीन वर्षे शाळेला विविध स्वरुपात मदत करीत असते, त्यातून जपले गेलेल्या स्नेहाच्या संबंधांतून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना आपल्या शेतातील शेतीमाल `वाणवळा` म्हणून दिला. तर सीमेवरील सैनिकांसाठी स्वतः बनविलेली भेटकार्ड संस्थेकडे सुपूत्र केली.

स्नेहांकुर दरे ऑफ होप या संस्थेचे प्रमुख जयप्रकाश दातार, अॅड. वृषाली दातार, अॅड. अभिषेक दातार आदी मान्यवर व मुख्याध्यापक राजेंद्र गरुड, संतोष कामथे, गणेश लवांडे, सुवर्णा जगताप आदी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.

सध्याच्या कोरोना काळातही शारीरीक अंतर पाळून कोरोना नियम पाळून शंभर टक्के विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. गुरोळीसारखे डोंगराच्या कुशीतील दुर्गम गावांत सोय सुविधा कमी असूनही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड जपली याबद्दल संस्था प्रतिनीधींनी शिक्षकांचे, पालकांचे आणि विदयार्थ्यांचे कौतूक केले. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे म्हणून मध्यंतरी `सुंदर हस्ताक्षर पुस्तकी`चे मोफत वाटप सुमारे 250 विद्यार्थ्यांना केले. त्यातून मुली -

मुलांचे वळणदार व सुंदर झालेले हस्ताक्षर पाहून आणि इंग्रजी स्पेलींग पाठांतर, पाढे पाठांतराचेही पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. खरे तर शिक्षक संतोष कामथे यांच्या प्रयत्नाने स्नेहांकुर द रे ऑफ होप ही संस्था या गुरोळी शाळेला जोडली गेली. तसेच संस्था वेळोवेळी वैविधपूर्ण खूप मदत करते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच सर्व मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य गेली तीन वर्ष संस्था देत आली आहे. सीमेवर देशासाठी आहोरात्र दक्ष असणाऱ्या सैनिकांसाठी मुलांनी बनवलेली ५० दिपावली भेटकार्ड व शुभेच्छा पत्र संस्थेला देण्यात आली. ती सैनिकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी घेत.. या उपक्रमाचे व राष्ट्रप्रेमाचे पाहुण्यांना विशेष कौतुक वाटले. विद्यार्थ्यांनीही अस्सल चवीची सीताफळे, अंजीर, पेरू, भाजीपाला दिल्यावर.. संस्थेचा व शाळेचा स्नेहाचा अंकुर अजून वाढेल असे पाहुणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT