पुणे

बीव्हीजी कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

CD

मोफत ई-रिक्षा सेवेत भाविकांकडून पैसे उकळले
विठ्ठल मंदिर समितीची कारवाई; कंत्राटी चालकाची सेवेतून हकालपट्टी
पंढरपूर, ता. १६ : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या मोफत ई-रिक्षा सेवेत भाविकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी बीव्हीजी कंपनीचा कंत्राटी चालक कुणाल राजेंद्र घोडके याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला सेवेतून कमी करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीमार्फत वयोवृद्ध, दिव्यांग तसेच गरोदर महिला भाविकांसाठी मंदिर परिसरात मोफत ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड मार्फत कंत्राटी पद्धतीने चालक नियुक्त करण्यात आले आहेत. यातील चालक कुणाल घोडके याने भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मंदिर समिती प्रशासनाने त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
.....
कोट
मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत आहे. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. कोणत्याही व्यक्तीकडून शुल्काची मागणी करण्यात आल्यास भाविकांनी तत्काळ मंदिर समितीकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मंदिर समिती अशा घटनांकडे गांभीर्याने पाहात असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी चालक कुणाल घोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन

Manchar Power Cuts: मंचर शहरात दररोज पाच-सहा वेळा वीज खंडित; २० हजार ग्राहक हैराण, रुग्णालये व व्यवसायांवर मोठा परिणाम

Cyber Crime : सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देऊन एक कोटी ३२ लाखांची फसवणूक

Kanersar Health Camp: कनेरसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर, वह्या वाटप व गुणवंतांचा सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

Cooperative Reforms: बदलत्या आर्थिक काळात पतसंस्था व बँकांनी सक्षम, पारदर्शक व व्यावसायिक होण्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT