पुणे

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

CD

वडगाव निंबाळकर, ता. १५ : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील गणेश रामदास मदने याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटो प्रसारित करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश मदने याने पीडितेशी संपर्क वाढवून लग्नाचे आश्वासन दिले. आपले सध्याचे लग्न मोडून विवाह करण्याचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी लैंगिक शोषण केले. लग्नाची मुदत उलटल्यानंतरही आरोपी प्रतिसाद देत नसल्याने फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मानसिक तणावातून पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिस चौकशीत हा प्रकार उघड झाला. बारामती शहर पोलिसांनी हे प्रकरण वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केले असून, भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांनी सांगितले की, पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. पोलिस पथके त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT