Pune University Sakal
पुणे

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

कोरोनाच्या काळात आईचे किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचे व यंदाचे परीक्षा शुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - कोरोनाच्या काळात (Corona Period) आईचे (Mother) किंवा वडिलांचा (Father) मृत्यू (Death) झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे (Student) गेल्यावर्षीचे व यंदाचे परीक्षा शुल्क (Exam Fee) पूर्ण माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबत सविस्तर परिपत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. मात्र, यंदा महाविद्यालयांकडून शुल्कवाढ केली जाणार असताना त्यास स्थगिती देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला नसल्याने लाखो विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीची टांगती तलवार कायम आहे. (Waived of Examination Fees for Students Lost their Parents Pune University Decision)

पुणे विद्यापीठाची आज (शनिवारी) व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत, त्यामध्ये कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडील कोरोनामुळे गमावले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफ करावे असा प्रस्ताव व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.

विद्यापीठाने एकीकडे या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असला तरी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या शुल्कवाढ स्थगितीच्या मुद्द्यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच चर्चा झालेली नाही. पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे शुल्कवाढ केली आहे, पण गेल्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने त्यास एका वर्षासाठी स्थगिती दिली. पण आता २०२१-२२ या वर्षासाठी वाढ होऊ शकणार आहे, त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून याकडे विद्यापीठाचे लक्ष वेधले होते. तसेच विद्यार्थ्यांनीही गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शुल्कवाढ स्थगित करावी अशी मागणी केली होती. पण आजच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही, पुढच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे

‘कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील वारले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे. पुढच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नाही, व गेल्यावर्षी विद्यार्थ्याने शुल्क भरले असेल तर ते परत केले जाईल. पुढील वर्षाच्या शुल्क वाढीस स्थगिती देण्यासाठी पुढच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’

- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

‘आई किंवा वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. या योजनेच्या नियम, अटी काय असतील, विद्यार्थ्यांकडून अर्ज कसे भरून घ्यायचे याबाबत सविस्तर माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाकडून काढले जाईल. तसेच २०२१-२२ या वर्षाच्या शुल्कवाढीस स्थगिती देण्याबाबत आज चर्चा झाली नाही.’

- डॉ. एन. एस. उमराणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT