Laxmi Road Sakal
पुणे

Walking Plaza : लक्ष्मी रस्त्यावर रविवारी 'वॉकिंग प्लाझा'

पुणे महापालिकेच्या वतीने पादचाऱ्यांसाठी येत्या रविवारी (ता.11) लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा' राबविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या वतीने पादचाऱ्यांसाठी येत्या रविवारी (ता.11) लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा' राबविण्यात येणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या वतीने पादचाऱ्यांसाठी येत्या रविवारी (ता.11) लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा' राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लक्ष्मी रस्ता रविवारी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने पादचारी दिनाचे औचित्य साधून पादचाऱ्यांसाठी रविवारी लक्ष्मी रस्त्यावर खास वॉकिंग प्लाझा" आयोजित केला आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत वॉकिंग प्लाझा होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान वॉकिंग प्लाझा आयोजित केला आहे. त्यामुळे या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीला बंदी असणार आहे. सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक या दरम्यान वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाने दिली आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

- लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहने सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याने पुढे सरळ जातील.

- निंबाळकर तालीमकडून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने कुंटे चौकातून सरळ कुमठेकर रस्त्याने पुढे जातील

- नागनाथ पार चौकातून उंबऱ्या गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्याने पुढे जाणारी वाहने सरळ पत्र्या मारुती चौक, रमणबाग चौकातून पुढे जातील

- पत्र्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने सरळ कुमठेकर रस्त्याने पुढे जातील

- खालकर तालीम चौकातून विजय टॉकीज, लक्ष्मी रस्त्याने न जाता कुमठेकर रस्त्याने इच्छितस्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT