PNE26W34670 - सोलापूर : वाराही शाकंभरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वांगी, लिंबू व डाळींबाच्या हारासह पुष्पांची अलंकारपूजा केली होती
PNE26W34679 - श्री कालिकामातेस दुग्धाभिषेक व पूर्णाभिषेक करताना.
PNE26W34678 - मंगलकलशांचे पूजन करताना मंदिराचे अर्चक.
दक्षिणा कालिकामातेस ५१ किलो फळ-भाज्यांचा हार
वाराही शाकंभरी महोत्सव; १०८ कलशांद्वारे अष्टोत्तर कलशाभिषेक; सहस्त्रनाम कुंकुमार्चन, आरतीने पहिल्या दिवसाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : देवी शाकंभरीच्या कृपाशिर्वादाचे स्मरण म्हणजे वाराही शाकंभरी महोत्सव. श्री दक्षिणा कालिका माता मंदिरात बुधवारपासून ६६ व्या वाराही शाकंभरी महोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीमातेला ५१ किलो फळ-भाज्यांचा हार अर्पण करण्यात आला. १०८ मंगल गंगाजल कलशांतील पवित्र गंगाजलाने अष्टोत्तर कलशाभिषेक व पूर्णाभिषेक करण्यात आला, तर सहस्रनाम कुंकुम अर्चना आणि महाआरतीने पहिल्या दिवसाच्या धार्मिक विधींची सांगता झाली.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता संस्थेचे कायम विश्वस्त नारायणराव काळपगार यांच्या हस्ते गणपती पूजनाने झाली. त्यानंतर अंबादास कोनापुरे यांच्या हस्ते महोत्सवाचे ध्वजारोहण केले. सकाळी ८ वाजता १०८ मंगल कलशांतील गंगाजलाने श्री दक्षिणाकालिकामातेचा अष्टोत्तर कलशाभिषेक व पूर्णाभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीमातेला अलंकारांनी सजविले. अग्निप्रतिष्ठापनेनंतर महाआरतीने सकाळच्या धार्मिक विधींची सांगता झाली.
------------------
सायंकाळी सहस्रनाम कुंकुम अर्चना, प्रदोषकाल पूजा व महाआरतीने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. पहिल्या दिवशी सहा दांपत्यांच्या हस्ते विशेष पूजन करण्यात आले. शास्त्रोक्त पौरोहित्य अमित, मिलिद, मंजुनाथ, श्रीनिवास, चिंतामणी या कुलकर्णींनी केले. देवीमातेला अर्पण केलेला वांगी, डाळिंब आणि लिंबू भक्तांना आज वाटप करण्यात येणार आहे.
--------------
कोट PNE26W34672
आंध्रप्रदेशात हा उत्सवाप्रमाणे मातेला विविध फळे व भाज्यांचा हार पंधरा दिवस अर्पण करण्यात येतो. सकाळी मी डोक्यावर मंगल कलश घेऊन मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा केली. त्यानंतर मातेला अष्टोत्तर कलशाभिषेक व पूर्णाभिषेक करून ६६ वा वाराही शाकंभरी महोत्सव आरंभ झाला.
- नारायणराव काळपगार, कायम विश्वस्त मंदिर समिती
----------------
पंधरा दिवस फळ-भाज्यांच्या हारांची परंपरा
- वाराही शाकंभरी महोत्सवात देवीमातेला सलग पंधरा दिवस विविध फळे व भाज्यांचे हार अर्पण केले जातात.
- पहिल्या दिवशी सहा दांपत्यांच्या हस्ते विशेष पूजन करण्यात आले.
- ३१ किलो वांगी, १० किलो लिंबू आणि १० किलो डाळिंबाचा हार गुरुवारी भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे.
- फळे व भाज्यांचा प्रसाद वाटण्याची परंपरा मंदिर समितीने यंदाही कायम ठेवली आहे.
-----------------
कोट PNE26W34673
देवीमातेच्या सामान्यपात्र, वथनीपात्र, विशेषयज्ञ पात्र या तीन पात्रांचीही स्थापना झाली. १०८ कलशांमधील औषधी पाण्याने देवीमातेस स्नान व १०८ नारळांचा अभिषेक, हवनअर्चना पूजन पार पडले. शेकडो वर्षांचा दुष्काळ दूर सारण्यासाठी देवीने स्वत:च्या शरीरातून फळे व भाज्या उत्पन्न केल्या. त्याचे स्मरण म्हणजे हा उत्सव आहे.
- व्यंकटेश कुलकर्णी, प्रधान अर्चक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.