फोटो : विनय कोरे
दसऱ्याला वारणा श्रीखंडाची ४५० टन विक्री
ॲग्रोवन वृत्तसेवा
वारणानगर, जि. कोल्हापूर : दसरा सणानिमित्त वारणा दूध संघाने तब्बल ४५० टन श्रीखंडाची विक्रमी विक्री केली असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
या विक्रमी विक्रीमुळे वारणा ब्रँडवरील ग्राहकांचा दृढ विश्वास आणि वारणा उत्पादनांची वाढती लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचेही कोरे यांनी सांगितले. वारणा दूध संघाच्या दर्जेदार, स्वादिष्ट आणि गुणवत्तापूर्ण श्रीखंडाला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली. सणाच्या काळात वाढलेली मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना श्रीखंड उपलब्ध करून देण्यासाठी संघाने नियोजनबद्ध पद्धतीने उत्पादन व वितरण व्यवस्था राबविली. विक्रमी विक्रीमध्ये दूध उत्पादक शेतकरी, संघाचे अधिकारी व कर्मचारी, वितरक, विक्रेते आणि ग्राहकांचे मोलाचे योगदान आहे.
संघाने वारणा अमृतबंध योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून दूध उत्पादकांना वर्षातून २ किलो श्रीखंड देण्यात येणार आहे. या योजनेत दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले आहे.
दसऱ्याच्या गोडव्याला वारणा श्रीखंडाची साथ आणि ग्राहकांच्या विश्वासातून विक्रीचा नवा विक्रम, हीच वारणा दूध संघाच्या यशस्वी वाटचालीची ओळख ठरली असल्याचे संघाचे अध्यक्ष एच.आर.जाधव, उपाध्यक्ष अँड एन.आर.पाटील, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.