पुणे

दौंड–कलबुर्गी जलद रेल्वे पॅसेंजरला वाशिंबे स्टेशनव प्रवासी थांबा मंजूर

CD

WSB26A00221
संग्रहित छायाचित्र.
---
दौंड-कलबुर्गी रेल्वेला वाशिंबे थांबा
पुण्याच्या दिशेनेही थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू
सकाळ वृत्तसेवा
वाशिंबे, ता. २५ : वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड- कलबुर्गी जलद रेल्वे पॅसेंजरला प्रवासी थांबा मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाल्याने विद्यार्थी, शेतकरी व व्यापाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या मागणीसाठी प्रवासी सेवा संघ आणि लोकप्रतिनिधींकडून दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. रेल्वे प्रशासनाकडून २८ ऑगस्टपासून थांब्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाशिंबे येथून सकाळी ५.५४ वाजता रेल्वे सुटून सकाळी ९.२० वाजता सोलापूरला पोचते. तसेच सायंकाळी ६.३५ वाजता सोलापूरहून सुटून रात्री ९.२० वाजता वाशिंबे येथे येते व पुढे दौंडकडे जाते.
प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दिग्विजय बागल, नगरसेवक दीपक चव्हाण, संचालक गणेश झोळ, भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित साळुंके, जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सूर्यवंशी, प्रदीप पवार, तसेच वाशिंबेतील सुयोग झोळ व नागरिकांनी यासाठी पाठपुरावा केला.
यासाठी सोगाव, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव व राजुरी येथील ग्रामपंचायती, अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय आणि पत्रकार संघाचेही सहकार्य लाभले. निवेदने, ई-मेल, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे मागणीला बळ मिळाले. अखेर रेल्वे बोर्डाने वाशिंबे स्टेशनवर दौंड- कलबुर्गी रेल्वेला प्रवासी थांबा मंजूर केला.
---
कोट
ही मागणी केवळ कागदावर मांडली नाही, तर दोन वर्षे प्रत्येक स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेक अडचणी आल्या; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. या निर्णयात प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकारांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला. सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेनेही थांबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
- सुयोग झोळ, वाशिंबे
---
कोट
या रेल्वेच्या थांब्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व व्यापाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सोलापूरला जाण्या-येण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. मागणीला अखेर यश मिळाले.
- तानाजी डोंबाळे, प्रवासी, वाशिंबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT