water 
पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार; दिवसाआड पाणी

उत्तम कुटे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा राहिल्याने शहरात आणखी पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

सध्या आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मात्र, कमी होत चाललेली धरणाची पातळी पाहता दिवसआड  पाणी शहरवासियांना देण्याची पाळी येणार आहे. अथवा दररोजच्या पाणी पुरवठ्यात कपात करावी लागेल.परिणामी शहरात अगोदरच काही सोसायट्यांना टँकरने पाणी द्यावे लागते आहे. त्यात आणखी भर पडणार आहे.

पवनाची साठवणक्षमता ८.५१ टीएमसी आहे. २ मे पर्यंत त्यात  २.५२ टीएमसी पाणी राहिलेले  आहे गतवर्षी ते या कालावधीपर्यंत ३.१८ टीएमसी होते. आजचा पाणीसाठा हा २५ जूनपर्यंत पुरेल एवढा असल्याचे पवनाचे उप अभियंता ए.एम.गडवाल यांनी सांगितले. दुसरीकडे पावसाला खरी सुरुवात आणि धरणात पाणीसाठा होण्यास जुलै मध्ये सुरुवात होते. त्यामुळे जुलैपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक संपताच जसे पुण्याचे पाणी आठवड्यातून एकदा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तसा तो पिंपरी चिंचवडमध्ये अगोदरच घेण्यात आला आहे आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकतर, ते दिवसाआड करावे लागेल वा दररोज १०ते वीस टक्के कमी पाणी द्यावे लागणार आहे. दुसरीकडे पाणीवापराबाबत अजून पुरेशी जागरूकता आणि त्याचे गांभीर्य नाही बांधकामाला पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. वॉशिंग सेंटर सुरु आहेत. पाण्याचा काटकसरीने वापरच होत नसल्याचे चित्र आहे 

गतवर्षी ऑगस्टमध्ये पवना भरले. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. मात्र नंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाणीसाठा कमी राहिला, असे गढवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT