पुणे

''कुकडी, डिंभे, चासकमानमधून आवर्तन सोडा''

CD

मंचर, ता. २३ :"पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी कुकडी, हुतात्मा बाबू गेनू (डिंभे धरण) व चासकमान धरणांतून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात वळसे पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र देऊन पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. तसेच त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता स्पष्ट केली. पावसाने जुलै २०२६ नंतर अचानक पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके आता पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अनेक गावांमध्ये शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेती आणि शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निर्णय घेणे आवश्यक आहे. कुकडी, डिंभे आणि चासकमान प्रकल्पांतून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून तातडीने आवर्तन सोडल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे वळसे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही
शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कायमच आग्रही भूमिका घेतली आहे. सध्याच्या संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा.",

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

SCROLL FOR NEXT