पुणे

पुणे : पाणी पुरवठ्याच्या कामाचे मजूर येणार थेट विमानाने

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे ः महापालिकेतर्फे सुरू असलेल्या २४ बाय ७ योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी परप्रांतीय मजूरांना पुण्यात विमानाने आणण्यात येणार आहे. पुढील १० दिवसांत हे मजूर येतील. तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक भागात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी भेट घेऊन अडचणी सोडवतील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सभागृहात दिली.

महापालिकेच्या मुख्यसभेत २४ बाय ७ योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल नगरसेवकांनी टीका केली. त्यावर पावसकर यांनी खुलासा केला. पावसकर म्हणाले, पाणी साठवण क्षमता वाढविणे, गळती कमी व्हावे यासाठी टाक्या बांधल्या जात आहेत. कोरोनामुळे अनेक परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात गेले आहेत. सध्या केवळ ४० टक्के मजुरांवरच काम सुरू आहे. हे काम वेगात सुरू व्हावे यासाठी कामगारांना विमानाने घेऊन येण्याचे नियोजन ठेकेदाराकडून केले जात आहे. पुढील १० दिवसात मजूर येतील.

२४ बाय ७ योजनेअंतर्गत ६ पंपिंग स्टेशन बांधणार असून, साडे तीन लाख मिटर बसवणार आहोत. शहरात एकूण १४१ झोनमध्ये २४ बाय ७ योजना विभागली आहे. या वर्षाखेरीज ५० झोनचे काम पूर्ण होईल. महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे व नव्याने समाविष्ट होणारी २३ अशा ३४ गावांमध्ये २४बाय ७ योजना राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. त्यांच्या अहवालावरून पुढील काम केले जाईल.

मुळशी धरणाचा प्रस्ताव लवकरच सादर-पुणे शहरासाठी मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. तो शहर सुधारणा समितीमार्फत सादर केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना देऊन सुद्धा विलंब केला जात असल्याने यावर विरोधकांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT