tanker 
पुणे

पुण्याच्या पश्चिमेला पाऊस थांबेना,  पूर्वेला मात्र थेंबही पडेना! 

ज्ञानेश्वर रायते

बारामती : राज्यात इतरत्र महापुराने दैना उडवली असली व पुणे जिल्ह्यात नीरा व भीमा नदीला महापुराची स्थिती उद्भवली असली तरी, जिल्ह्यात अजूनही 43 टॅंकर सुरू आहेत. बारामतीत तर सरकारी 13 टॅंकरच्या जोडीला बारामती तालुका दूध संघांचे टॅंकरही अजून सुरूच आहेत. 

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि पूर्वेकडील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यात मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच या चार तालुक्‍यांसह आंबेगावमध्ये मिळून अजूनही 43 टॅंकर सुरूच आहेत.

बारामती तालुक्‍यात सर्वाधिक 115 वाड्यावस्त्या व 11 गावे ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा झेलतच आहेत. या गावांसाठी 13 टॅंकर सुरू आहेत. मात्र, याव्यतिरिक्त बारामती तालुका दूध संघाचेही टॅंकर सुरू आहेत. त्याखालोखाल इंदापूर तालुक्‍यात 12 गावे व 58 वाड्यावस्त्यांना मिळून 14 टॅंकर सुरू आहेत. पुरंदर तालुक्‍यात 7 टॅंकरच्या माध्यमातून 7 गावे व 42 वाड्यांना पाणी सुरू असून, दौंड तालुक्‍यात 7 गावे व 50 वाड्यांना 9 टॅंकर सुरू आहेत. आंबेगाव तालुक्‍यात 1 गाव व 2 वाड्यांसाठी 1 टॅंकरच्या खेपा सुरू आहेत. 

मागणी असूनही टॅंकर बंद 
बारामती तालुक्‍यातील कुतवळवाडी, बोरकरवाडी, नारोळी, कोळोली येथील नागरिकांनी टॅंकर हवा असताना बंद केला जात असल्याची तक्रार केली. मात्र, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी नारोळी, कोळोली येथे टॅंकर सुरूच आहेत, फक्त कुतवळवाडी व बोरकरवाडी परिसरात तीन किलोमीटर अंतरामध्ये पाणी असल्याने तेथील टॅंकर बंद केले आहेत. तरीदेखील बारामती तालुका दूध संघाचे टॅंकर या भागात सुरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

Vaibhav Sooryavanshi कमी होता, त्यात आणखी एकाची भर पडली! २० वर्षीय टीममेटचा कहर, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Pune indigenous defence tech: पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञांचा स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित ड्रोन, स्वायत्त बोटींद्वारे जलसुरक्षेत क्रांती

Marathi News Live Updates: राज्यातील भरती परीक्षेसाठी राज्य शासनाकडून ७ अधिकाऱ्यांची सुधारणा समिती गठीत

Blood Pressure: हाय बीपीवर फक्त मीठ कमी करण्याचा उपाय पुरेसा नाही; पोटॅशियम वाढवणेही गरजेचे! संशोधनातून नवा खुलासा...

SCROLL FOR NEXT