पुणे

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर

CD

काटेवाडी, ता. १३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ व २०२५-२६ च्या मृग बहारासाठी डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ व द्राक्ष या ८ फळपिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून, नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास मदत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.

अंतिम मुदत १४ जुलैपर्यंत
डाळिंब फळपिकासाठी खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत १४ जुलै असून विमा संरक्षित रक्कम एक लाख ६० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ८ हजार रुपये राहील.

पेरू फळपिकासाठी इंदापूर, खेड, पुरंदर, हवेली, भोर, बारामती, दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाची अंतिम मुदत २५ जून आहे. चिकू पिकासाठी आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, पुरंदर, शिरूर व बारामती तालुके अधिसूचित असून सहभागाची अंतिम मुदत ३० जून आहे.

सीताफळ पिकासाठी आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, शिरूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या तिन्ही पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ३ हजार ५०० रुपये असा आहे.

लिंबू फळपिकासाठी इंदापूर, शिरूर, बारामती व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत २५ जून असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता चार हजार रुपये असा आहे. संत्रा पिकासाठी शिरूर तालुका अधिसूचित असून सहभागाची अंतिम मुदत २५ जून तर मोसंबी पिकासाठी इंदापूर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. दोन्ही पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ५ हजार रुपये असा आहे.

द्राक्षे क फळपिकासाठी इंदापूर, बारामती व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत २५ जून असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता १९ हजार रुपये असा आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स या कार्यान्वित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२०९५९५९ किंवा ई-मेल आयडी bagichelp@bajajallianz.co.in वर संपर्क साधून सहभाग नोंदवावा.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

अपूर्वा नेमळेकरने स्वत:च्या लग्नात शरारत गाण्यावर केला धमाकेदार डान्स, VIRAL VIDEO

"माझा पार्टनर फक्त.." धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणालचा खुलासा; म्हणाली..

Karad Crime: शाळकरी विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; व्हॅलेंटाइन डेदिवशी धक्कादायक घटना उघडकीस, कऱ्हाडमध्ये उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT