पुणे

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

CD

उत्रौली, ता. १८ : वीसगाव (ता. भोर) खोऱ्यातील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी बांधलेले कृत्रिम पाणवठे ऐन उन्हाळ्यात कोरडे पडले आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी उपलब्ध नसल्याने वन्यजीवांचे प्रचंड हाल होत असून, पाण्यासाठी ते नागरी वस्त्यांकडे येत आहेत.
वीसगाव खोऱ्यातील हातनोशी, गोकवडी, उत्रौली, भाबवडी, आंबाडे घाट, बारे खुर्द, किवत, नांद आणि सांगवी भिडे परिसरात शासकीय आणि ‘सीएसआर’ निधीतून हे पाणवठे बांधले आहेत. या भागात बिबट्या, हरीण, भेकर, रानडुक्कर, लांडगा आणि मोरांचा वावर आहे. मात्र, कडक उन्हामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले असून, कृत्रिम पाणवठ्यांमध्येही पाणी भरले जात नसल्याने वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. तसेच, परिसरात लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदा नष्ट होऊन चाऱ्याचीही कमतरता निर्माण झाली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पाणवठ्यात पाणी सोडले होते; मात्र निधीच्या कमतरतेमुळे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर गेल्या दोन दिवसांत उत्रौली, हातनोशीतील पाणवठ्यात पाणी सोडले असून, उर्वरित पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
- शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर

00537

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Fifty: पोराने पुन्हा कमाल केली! वैभवची षटकार खेचून फिफ्टी... शमीला सलाम अन् प्रतिस्पर्धींना फोडला घाम

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT