PIFF inauguration 
पुणे

‘पिफ'ला कायमस्वरूपी वास्तू उपलब्ध करुन देणार - महापौर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ प्रदान

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पिफ) कायमस्वरूपी वास्तू उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह यंदाच्या पिफचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ प्रदान करण्यात आला.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कॅनडाचे कॉन्सुल जनरल मायकल वोंक आदी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरु राहावे यासाठी महोत्सवाला कायमस्वरूपी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिका सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. जगभरात अनेक व्यवस्थांवर कोविड काळात ताण आला. मनाला वेदना देणारी ही परिस्थिती होती. मात्र महोत्सवाच्यावतीने या काळात काम केलेल्या योध्यांचा गौरव करण्यात येत आहे, हे अतिशय मोठे काम आहे. या काळात पुणे महापालिकेचे ८५ लोक मृत्युमुखी पडले. त्यांचेही स्मरण करणे गरजेचे आहे”

महोत्सवादरम्यान जगभरातील १२७ चित्रपट दाखविले जाणार

यावर्षीच्या कोविडच्या परिस्थितीमुळे हा महोत्सव यावर्षी डिसेंबरमध्ये होत असल्याचे सांगून, डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले, “आपण गेली दोन वर्षे व्हर्चुअल जगात आहोत. त्यामुळे चित्रपटगृहात येऊन कार्यक्रम पाहण्याचा हा अनुभव वेगळा आहे. कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी काम केले त्यांचा कृतज्ञतापूर्वक पटेल यांनी उल्लेख केला आणि हा महोत्सव त्यांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितलं. महोत्सवादरम्यान जगभरातील १२७ चित्रपट दाखविले जाणार असल्याचेही पटेल यांनी सांगितलं.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांचा कोविड काळात केलेल्या कामाबद्दल महापौर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आदिनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे, ‘एमआयटी विश्वशांती गुरुकुल'तर्फे एमआयटी म्युझिक स्टुडिओ यांचे सादरीकरण झाले. निकिता मोघे यांच्या ‘पायल वृंद अकॅडमी’तर्फे विविध गाण्यांवर नृत्यं सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT