Jayant Patil sakal
पुणे

शहाणा पक्ष एका खासदारासाठी नगरसेवक धोक्यात टाकणार नाही; जयंत पाटील

‘लोकसभेचा एक खासदार मिळविण्यासाठी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या नगरसेवकांना धोक्यात टाकणे असे कोणताही शहाणा पक्ष करणार नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - ‘लोकसभेचा एक खासदार मिळविण्यासाठी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या नगरसेवकांना धोक्यात टाकणे असे कोणताही शहाणा पक्ष करणार नाही. त्यामुळे आघाडी करून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यावरच सर्व पक्षांचा भर असणार आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आमचे स्थानिक पातळीवरचे नेते चर्चा करतील, त्यास आमचा पाठिंबा असेल,’’असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्ट केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक आल्यास लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल यामुळे काँग्रेसचा आघाडीत येण्यास विरोध आहे का ? राष्ट्रवादीची काय भूमिका काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी "एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही असे उत्तर दिले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र यावेत ही आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना सोबत घेतील, त्यास आमची सहमती असेल, असे पाटील यांनी सांगितले.

प्रदेश पातळीवर नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांची समजूत काढणार का या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, समजूत काढण्याचा प्रश्‍न येत नाही, वारंवार ते जर स्वबळाची भाषा करत असतील तर ते त्यांचे धोरण होते. तरी देखील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे वेगळी भूमिका व्यक्त करत असतील तर ते भूमिका बदलू शकतील.’’

भाजपविरोधात जे आहेत त्यांना एकत्र घेतले पाहिजे कोणालाही सोडणे बरोबर नाही. सध्या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. महागाई, शेतकरी आंदोलन असे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे. हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. शिवसेना आमच्यापासून दूर जावी यासाठी फडणवीस हे कायम सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. राजकारणासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणे योग्य नाही, अशी टीका फडणवीस यांच्यावर केली.

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची कुठलीही घाई नाही. चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. फडणवीस यांच्या आडून तेच मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगून आहेत. पण पक्षात आपले हितचिंतक कोण आहेत हे फडणवीस चांगली माहिती असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT