Woman murdered for not paying wages sakal
पुणे

कुंटनखाणा चालवणाऱ्या महिलेला अटक

रविंद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव (Narayangaon) शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकून नारायणगाव पोलिसांनी (police) स्वतःच्याच घरात कुंटनखाणा चालवणाऱ्या संगीता संजय भोईटे (वय ४७ , राहणार कोल्हेमळा रोड, नारायणगाव) या महिलेला अटक केली, अशी माहीती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. (Woman arrested for prostitution business)

संगीता भोईटे या येथील ग्रामीण रुग्णालया जवळ असलेल्या इमारतीत कुंटनखाणा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता या कुंटनखाण्यात तीन महिला आढळून आल्या. या महिलांकडे चौकशी केली असता आम्ही ओळखीचे लोकांकडुन पैसे घेवुन या ठिकाणी वेश्या व्यवसाय करतो. मिळालेल्या पैशातुन ठरावीक रक्कम रूम मालकीन संगीता भोईटे यांना देत आहोत.

या वरून पोलिसांनी संगीता भोईटे यांचेवर गुन्हा रजि. नंबर  १४२/२०२१ अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५९ चे कलम ३, ४,५,७(१)(ब) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या महिलांना मुंढवा (पुणे ) येथील महिला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक ताटे,दिनेश साबळे ,मेचकर, धनंजय पालवे, सचिन कोबल, शैलेष वाघमारे, होमगार्ड आकाश खंडे यांचे पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT