पुणे

शहरातील महिला, मुलींना मिळणार पोलीस व संगणक प्रशिक्षण

CD

महिला, मुलींना मिळणार पोलिस अन्‌ संगणक प्रशिक्षण
महिला व बालकल्याण समितीचे निर्णय; ८४ लाखांच्या कामांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महिला व मुलींसाठी संगणक प्रशिक्षण, गरजूंसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यासाठी ८४ लाखांची तरतूद असून, या कामांना मंजुरी दिल्याची माहिती निर्मला जंगम यांनी दिली.
महिला व बालकल्याण समितीची बैठक आज सभापती निर्मला जंगम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील महिला व मुलींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि महिला व मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. शहरातील महिला व मुलींसाठी संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महिला व मुलींच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन मनपाच्या प्रसूतिगृहांमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये तसेच महापालिका इमारतींमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. तसेच मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर प्युरिफायर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात पात्र व गरजू महिला व मुलींसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये एकल महिला आणि त्यांच्या मुलींना तसेच सन २०२५-२६ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ ते २५ वयोगटातील मुलींना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना पोलिस दलात प्रवेशासाठी आवश्यक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT