पुणे

पारनेर - आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल

CD

SPU26B06651
पारनेर ः कौशल्य विकास कार्यशाळेत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींसह प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर व मान्यवर.

कौशल्यातून विद्यार्थिनींची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

पारनेर, ता. २५ : आधुनिक युगात महिलांनी केवळ पदवीपर्यंत शिक्षण घेत मर्यादित न राहता व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने येथील महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. ते म्हणाले, "आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांचे आर्थिक स्वावलंबन ही काळाची गरज आहे. या कोर्समधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि पूर्ण आत्मविश्वासाने समाजात वावरतील."
यावेळी समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हरेश शेळके, पर्यवेक्षक प्रा. श्यामराव घनघाव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापिका व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. सरिता कुंडलीकर, यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. माया लहारे यांनी केले. आभार प्रा. दीपाली सातपुते यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सायली सोनवणे, प्रा. अदिती जेजूरकर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

SCROLL FOR NEXT