pun rain sakal
पुणे

पुण्यात ऊन-पावसाचा खेळ

शहरात १ जून ते २६ ऑगस्ट या दरम्यान सरासरी ४२६.१ मिलिमीटर पडतो

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे (Pune) शहर आणि परिसरात गुरुवारी श्रावणसरी पडल्या. त्यामुळे कधी पावसाची हलकी सर तर, त्यानंतर लगेच पडलेला स्वच्छ सूर्यप्रकाश असा ऊन-पावसाचा खेळ पुणेकरांनी अनुभवला.

शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. श्रावण सुरू झाल्यापासून शहरात ढगाळ वातावरण होते. पावसाची एखादी हलकी सर पडत होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात श्रावणसरींनी हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी आणि त्यानंतर लगेच सूर्यप्रकाश पडत होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत ०.७ आणि लोहगाव येथे ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरात १ जून ते २६ ऑगस्ट या दरम्यान सरासरी ४२६.१ मिलिमीटर पडतो. यंदा आतापर्यंत ३८३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ४२.७ मिलिमीटर कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता. २७) आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात पावसाच्या सरी पडल्याने ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा गुरुवारी २९.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला होता. किमान तापमानाचा पारा २०.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

राज्यात पावसाची उघडीप

पावसासाठी सध्या पोषक वातावरण नसल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह कोरडे हवामान होत आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. खानदेश, मराठवाडा, पूर्व मध्य महाराष्ट्राचा भाग, पश्चिम विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT