Building sakal
पुणे

कॅन्टोन्मेंटमधील पार्किंगच्या इमारतीचे काम निधीअभावी रखडले

केंद्रीय संरक्षण खात्याकडे निधीसाठी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट: ईस्ट स्ट्रीटवरील बॉम्बे गॅरेजसमोर रोबोटेक सिस्टीमचे पार्किंगसाठी नऊ मजली इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. या कामासाठी 17 कोटींचा प्रकल्प असून, 13.69 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी १८४ कार पार्किंग करता येणार आहेत, अशी माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी दिली.

अमित कुमार म्हणाले की, कॅन्टोन्मेंटमध्ये पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये ३८ हजार चौरस फूट जागेवर १८४ कार पार्किंगची व्यवस्था असणार आहे. मल्टी लीड पार्किंग प्रोजेक्ट २०१८ मध्ये सुरू केला आहे. त्यासाठी १३.६९ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर करून आराखडा तयार केला आहे. कॅन्टोन्मेंटने त्यासाठी दीड कोटी रुपये दिले आहेत. पार्किंगसाठीची ९ मजली इमारत असून, रोबोटेक सिस्टीमने वाहने पार्किंग केली जाणार आहेत. केंद्रीय संरक्षण खात्याकडे निधीसाठी मागणी केली आहे. पार्किंगमधून दरमहा ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

IND vs WI ODI Squad: यशस्वी, ऋतुराज IN; श्रेयस, इशान, बुमराहसह ७ खेळाडू OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ... असं का होणार?

Live Updates Marathi : स्वरूप नगर भागात बांधकामाधीन असलेले एक घर कोसळले

Chhatrapati Sambhajinagar News: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिमेंट रस्ता अचानक खचला; बिडकीनमध्ये खळबळ

Baramati News: माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये दमदार कामगिरी; २३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

SCROLL FOR NEXT