murder esakal
पुणे

Pune Crime : कामावरून काढून टाकल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या कामगाराचा खून

ठेकेदाराला सांगून कामावरून काढून टाकल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या कामगाराचा त्याच्या मित्रांनी हत्याराने वार करुन खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ठेकेदाराला सांगून कामावरून काढून टाकल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या कामगाराचा त्याच्या मित्रांनी हत्याराने वार करुन खून केला. ही घटना केसनंद रस्त्यावरील वाघोली परिसरात मंगळवारी (ता. २२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

शैलेश मांडगीकर असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय २५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड) आणि गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय २५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. सिट्रोन सोसायटीसमोर, वाघोली) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी हे कामगार आहेत.

मंगळवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पीत बसले होते. ठेकेदाराने श्रीरामच्या सांगण्यावरुन मांडगीकरला कामावरून काढल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. मांडगीकर याने श्रीराम आणि कोटलापुरे या दोघांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात आरोपींनी मांडगीकर याच्यावर हत्याराने डोक्यावर वार करून खून केला.

घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील करीत आहेत. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT