world record speaking number twelve language Entry in India Book records  sakal
पुणे

बारा भाषांमध्ये अंक बोलणाऱ्या कुशाग्रचे वर्ल्ड रेकॉर्ड

इंडिया बुक मध्ये नोंद ; सहा स्वदेशी आणि सहा परदेशी भाषांमध्ये अंकज्ञान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एक, दोन नव्हे तर तब्बल बारा भाषांमध्ये अंक बोलणाऱ्या पुण्याच्या कुशाग्रची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कात्रज परिसरातील जय गणेश रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या कुशाग्र प्रतीक पुरी याने चार वर्षे आणि नऊ महिन्यात ही अनोखी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कुशाग्रने युट्युबचा वापर केला आहे.(world record Entry in India Book records)

कुशाग्रची आई नमिता म्हणाल्या,"जन्मल्यानंतर सुमारे अडीच वर्षे कुशाग्र काही बोलतच नव्हता. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. त्याला लिपी वाचण्याची सवय लावावी म्हणून आम्ही काही प्रयत्न केले. त्यातूनच त्याला अक्षरांची ओळख झाली. पुढे तो युट्युबच्या साहायाने वेगवेगळ्या भाषेतील अंकांची ओळख करून घेऊ लागला." कुशाग्र मराठी, हिंदी, तेलगू, ओडिया, कन्नड आणि संस्कृत या मराठी भाषांसह इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, जापनीज, चायनीज, फ्रेंच या भाषांमध्येही एक ते १० अंक अस्खलितपणे बोलतो. सोशल मीडियाचा कुशाग्र पद्धतीने केलेला हा वापर जागतिक विक्रमात नोंद घेणारा ठरला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये कुशाग्रने हा विक्रम इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नोंदवला, नुकतेच त्याचे प्रमाणपत्रही त्याला प्राप्त झाले आहे. या आधीही कुशाग्रने इंग्लिश, हिंदी, मराठी आणि चायनीज या भाषेमध्ये एक ते १०० पर्यंतचे अंक म्हणण्याचा विक्रम केला आहे. असे दोन अभिनव इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुशाग्रच्या नावावर आहे.

''सुरवातीचे वर्ष कुशाग्र काही बोलत नव्हता. तेंव्हा त्याच्या आईने खेळाच्या माध्यमातून त्याला लिपीची ओळख करून दिली. कुशाग्र स्वयंअध्यायनातून युट्युबच्या माध्यमातून या वेगवेगळ्या भाषा आणि त्यांतील अंक ज्ञान आत्मसात करत आहे.''

- प्रतीक पुरी, कुशाग्रचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT