यशोदाच्या विद्यार्थ्यांचे
बी. फार्ममध्ये यश
सातारा, ता. १८ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या बी. फार्म अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागाने उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
या परीक्षेत अलिशा नजीरअहमद सय्यद, रुचिता अरुण माने आणि अनुष्का बाळकृष्ण गाढवे-देशमुख यांनी प्रत्येकी ८.९१ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला, तसेच प्रणाली जीवन साबळे, गौरव संजय पोतदार, नेहा शेखर पवार, श्रुतिका सुनील दगडे यांनी प्रत्येकी ८.७३ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळविला. आर्या सचिन दोशी आणि संपदा प्रकाश देशमुख यांनी ८.६४ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच ९६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे, प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव तसेच फार्मसी विभागप्रमुख डॉ. ए. एम. भागवत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसचा फार्मसी विभाग फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) मान्यताप्राप्त असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार फार्मसी शिक्षण देण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेकडून विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनासाठी पोषक शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यातही आपल्या गुणवत्तेची हीच परंपरा कायम राखत संस्थेचा नावलौकिक अधिक उंचवावा, अशी अपेक्षा प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.