पुणे

माय रेसिपी

CD

माय रेसिपी
------------
दही चटणी टोस्ट
------------
दोस्तांनो, ब्रेडला बटर, जॅम वा चटणी लावून तुम्ही खाल्ले असेल. सँडविचसुद्धा केले असेल. आज मात्र आपण ब्रेड टोस्टचा एक वेगळा प्रकार पाहूया. या टोस्टसाठी आपण बटर नाही, तर दही वापरणार आहोत. मोठ्या माणसांची मदत घेऊन तुम्ही हा चविष्ट टोस्ट सहज करू शकाल.
-------------
साहित्य
चटणीसाठी-
२ मूठी भरून कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या (कमी तिखट), २ लसूण पाकळ्या, पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस.

टोस्टसाठी
ब्रेडचे स्लाइस, १ कप दही, पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा काश्‍मिरी लाल तिखट (किंवा चिली फ्लेक्स), १ पुडी पिझ्झाबरोबर मिळणारे इटालियन सिझनिंग, पाव चमचा मीठ, टोस्ट भाजण्यासाठी लोणी किंवा तेल.
-------------
कृती
प्रथम कोथिंबीर, मिरच्या, लसूण, मीठ, साखर व लिंबाचा रस हे साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊन त्याची चटणी वाटून घ्या. गरज भासल्यास चटणी वाटताना १ किंवा २ चमचे पाणी घाला. एका पसरट व खोलगट बाउलमध्ये दही घ्या व ते ‘व्हिस्क’ने थोडे फेटा. त्यात काळी मिरी पूड, काश्‍मिरी लाल तिखट वा चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग व मीठ घालून फेटा. तयार करून ठेवलेली १ ते २ चमचे हिरवी चटणीसुद्धा दह्यात घालून एकत्र करा. या मसालेदार दह्याची चव पहा व त्यात काही कमी वाटत असेल तर ते घाला.
ब्रेडचा स्लाइस वरील दह्यात आधी एका बाजूने व नंतर दुसऱ्या बाजूने बुडवा. फ्राइंग पॅन मंद ते मध्यम चेवर तापत ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यात थोडे लोणी वा तेल घाला. दह्यात बुडवलेला ब्रेड स्लाइस लगेच पॅनमध्ये ठेवा व तो दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. गरमागरम दही चटणी टोस्ट टोमॅटो सॉसबरोबर व नुसतासुद्धा उत्तम लागतो.
-------------
काय काळजी घ्यावी?
- मिक्सर चालवताना, तसेच स्लाइस तव्यावर भाजताना मोठ्या माणसांची मदत घ्या.
- उरलेली चटणी वेगळ्या भांड्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा. ती इतर पदार्थांत वापरता येते, परंतु १ किंवा २ दिवसच चांगली राहते.
--------------
प्रयोग करा
- दह्यात घालण्यासाठी हिरवी चटणी न वाटता हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून दह्यात घालता येईल.
- हिरव्या चटणीऐवजी सुकी लसूण चटणी किंवा शेंगदाणा चटणीही वापरता येईल.
- दह्यात काहीही न घालता ते फेटून त्यात स्लाइस दोन्ही बाजूंनी बुडवा व अशा दोन स्लाइसच्या मध्ये साखर पेरून त्याचे सँडविच लोण्यावर टोस्ट करा. दही-साखर टोस्ट तयार होईल!
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT