Car Accident esakal
पुणे

Car Accident : दिघी-आळंदी मार्गावर कारची दुचाकीला जोराची धडक; तरुणाचा जागीच अंत, एकजण गंभीर जखमी

अपघातानंतर बलेनो कारचा चालक सतीश वाळके हा पळून गेला. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यामध्ये (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल झाला.

सकाळ डिजिटल टीम

आळंदी रोडने जात असताना समोरून निळ्या रंगाची बलेनो कार आली आणि त्याने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला.

विश्रांतवाडी : दिघी-आळंदी रस्त्यावर (Dighi-Alandi Road) आर्मी पब्लिक स्कूलजवळ (Army Public School) एका भरधाव बलेनो कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने स्वप्निल प्रदीप खरबडे (गजानन महाराजनगर, दिघी) हा तरुण जागीच ठार झाला. तर, प्रतीक सुरेश चांदोरे (गजानन महाराज मंदिर, दिघी) हा जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र विश्रांतवाडीवरून आळंदी रोडने जात असताना समोरून निळ्या रंगाची बलेनो कार आली आणि त्याने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर बलेनो कारचा चालक सतीश वाळके हा पळून गेला. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यामध्ये (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल झाला असून खडकी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अंसार शेख, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत. अपघातील फरार आरोपी सतीश वाळके याला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT